शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात वाद झाला होता. यात भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची राऊतांना दिली आहे. यामुळे संजय राऊत यांना अधिक सुरक्षा देण्यात आली आहे. राऊत यांना सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले आहेत. त्यामुळे आता राऊत यांच्या घराला छावणीचं स्वरुपही आलं आहे. नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) सुरू असलेल्या वादानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांचे घर आणि सामना कार्यालयातील (Saamna Paper) सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी आज संजय राऊत डीसीपी प्रशांत कदम (DCP Prashant Kadam) यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे.
यावेळी कदम यांनी राऊत यांच्यात सुरक्षेबाबत चर्चा झाली. कदम यांनी राऊत यांना सुरक्षे प्रश्नी काही सूचना दिल्या आहेत. आता राऊत यांच्याकडे दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच एसपीयूच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. याव्यक्तीरीक्त 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत केला आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा मिळत आहे. हेही वाचा Payal Rohatgi: अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल
राऊत यांना निलेश राणे यांनी दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली होती. तसेच शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. झोन-7 चे डीसीपी प्रशांत कदम आणि सुनील राऊत यांच्यात बैठक सुरू आहे. तसेच त्यांची सुरक्षाही लवकरात लवकर वाढवली जाईल. जन आशीर्वाद यात्रेपूर्वी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात संघर्ष निर्माण झाला होता.
राज्यातील अनेक ठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राणेंना अटक झाली होती. मात्र त्यांना जामीनही मिळाला. या दरम्यान राऊत प्रत्यक्षपणे आणि सामनातून राणेंवर टीका करत होते. यावरून राणे आणि राऊत यांच्यात एकमेकां विरोधात टीकास्त्र सोडत होते. यातच निलेश राणेंनी राऊतांना धमकी दिली आहे. यानंतर राऊत यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे.