Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रामध्ये मागील दीड वर्षाच्या काळात कोरोना संकटामुळे आरोग्य व्यवस्थेची नेमकी काय स्थिती आहे? याची प्रचिती नागरिकांसोबतच सरकारलाही आली आहे. आता राज्यात आरोग्य विभागामध्ये 16 हजार पदांवर तातडीची भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) दिल्याची माहिती एबीपी माझा ने दिली आहे. यामध्ये 2226 पदांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. दरम्यान राज्यात 118 आरोग्य संस्था असून 812 नियमित पदं निर्माण करण्यासाठी तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी पदानिर्मिती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार, 2226 पैकी काही पदं ही नियमित असतील तर काही कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट मधील जागा देखील भरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या पदनिर्मितीची माहिती देण्यात आलेली असली तरीही अद्याप भरती प्रक्रिया कधी, कशी होणार याची माहिती देण्यात आलेली नाही.

केलेल्या जाहिरातीनुसार लवकरच आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, स्त्री आणि पुरुष परिचालक, लिपिक, कक्ष सेवक, शिपाई, वाहन चालक, सफाई कामगार आदी पदांसाठी भरती होणार आहे. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार, अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. IBPS RRB Recruitment 2021: ग्रामीण बॅंकांमध्ये पीओ, क्लार्क पदांवर भरती 28 जून पर्यंत ibps.in वर असा करा ऑनलाईन अर्ज.

मागील दीड वर्षात रूग्णसेवेसाठी आवश्यक कुमक पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरोग्यक्षेत्राशी निगडीत सार्‍यांनाच पुढे येण्याचं आवाहन केले होते. त्यामध्येही अनेक ठिकाणी कंत्राटी स्वरुपात 6-6 महिन्यांसाठी अनेकांची निवृत्ती करण्यात आली होती.