Government Employee (Photo Credits: PTI)

नोकरी म्हटली की कर्मचा-याला ठराविक ड्रेसकोड हा आलाच! कॉर्पोरेट क्षेत्र म्हटलं की कोट, टाय, बूट यासारखा ड्रेसकोड (DressCode) पाहायला मिळतो. तिकडेच सरकारी कर्मचा-यासाठी (State Government Employees) शर्ट-पँट यासारखा साधासरळ ड्रेसकोड असतो. त्यामुळे अनेकांना जीन्स घालण्याची हौस पूर्ण करता येत नाही. मात्र महाराष्ट्र सरकारने सरकारी सेवेतील कर्मचा-यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यात यापुढे कर्मचा-यांना जीन्स (Jeans) घालून ऑफिसात जाता येणार आहे. केवळ टी शर्टवर बंदी कायम असल्याने तुम्ही जीन्स आणि शर्ट असा पेहराव करु शकता.

मंगळवारी (16 मार्च) रोजी महाराष्ट्र सरकारकडून ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली. याआधी सरकारने कर्मचा-यांनी जीन्स आणि टी-शर्ट घालण्यावर बंदी घातली होती. मात्र आता जीन्सवरील बंदी सरकारने हटवली आहे.हेदेखील वाचा-Maharashtra Government Jobs 2021: सरकारी नोकरीची संधी! महाराष्ट्र आरोग्य विभागात 3139 पदांची मेगाभरती

याआधी राज्य सरकारने राज्य सेवेतील कर्मचा-यांनी काय घालावे आणि घालू नये याबाबत माहिती दिली होती. तसेच स्वदेशी कपड्यांचा वापर व्हावा यासाठी कमीत कमी शुक्रवारी खादीचे कपडे घालावेत असे सक्युर्लर आणले होते.

या सर्क्युलरमध्ये असेही सांगण्यात आले होते की कर्मचारी योग्य तो पोशाख न घातल्यामुळे त्यांची लोकांमधील प्रतिमा मलीन होते. त्यामुळे त्यांची लोकांवर चांगली छाप पडावी यासाठी त्यांना ठराविक पोशाख वापरणे सक्तीचे केले होते. मात्र आता ही बंदी मागे घेण्यात आली आहे. मात्र टी-शर्ट वापरावरील बंदी अजूनही कायम आहे.

दरम्यान सरकारी महिला कर्मचा-यांना साडी, सलवार, चुडीदार कुर्ता, ट्राउजर पँट आणि शर्ट देखील घालता येणार आहे. मात्र ते सुस्थितीत असले पाहिजे अशी काळजी त्या त्या कर्मचा-याने घ्यावी असेही महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात येत आहे. तसेच कार्यालयामध्ये स्लिपर वापरणे बंधनकारक आहे. दरम्यान, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये शक्यतो  सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा लागणार आहे.