CM Eknath Shinde | (Image Credits - Twitter)

Maharashtra Government: 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याच्या महत्त्वाचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे. ही माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.राज्यातील जास्तीत जास्ती मुलींचे शिक्षण झाले पाहिजे या करिता सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. कुलगुरुंच्या बैठकीला राज्यपाल रमेश बैस हे देखील उपस्थित होते. (हेही वाचा- पर्यटन क्षेत्रातील महिलांसाठी खुशखबर; सरकारने जाहीर केली नवी कर्ज योजना, घ्या जाणून)

महाराष्ट्र सरकार शैक्षणित संस्थाना या खर्चाची परतफेड करेल. जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. चंद्रकात पाटील यांनी कुलगुरूंच्या बैठकीत शुक्रवारी घोषणा केली. सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात ५० टक्के शुल्क माफी होती. आता ही शुल्कमाफी 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. बैठकीत चंद्रकात पाटील म्हणाले की, उच्च शिक्षणातील विविध कोर्सेससाठी मोठ्या संख्येने मुलींनी प्रवेश घ्यावा यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करायला हवेत. तसेच कुलगुरूंनी वेळेवर निकाल लागावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

महाराष्ट्र  सरकारच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना फायदा होणार आहे. त्यामुळे मुलींची विद्यापीठातील प्रवेश संख्या वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष चूकू नयेत  आणि त्यांना वेळीच नोकरीची संधी हाती मिळून देत यासाठी विद्यापीठातून वेळेवर निकाल लागणे आवश्यक आहे. उशिरा निकाल लागल्यास त्यासाठी कुलगुरुंना जबाबादार धरले जावे असं ते यापूर्वी म्हणाले होते.