Aaditya Thackeray and NItin Raut | File Photos

महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भागात झालेल्या तुफान पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे मोठं नुकसान झाले आहे. सध्या राज्य सरकार आणि विरोधकांकडून या भागात पाहणी दौरे सुरू आहेत. मुख्यमंट्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या पाठोपाठ आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. कोकण दौर्‍यावर आज नितिन राऊतांसोबत आदित्य ठाकरे  चिपळूण, महाड दौर्‍यावर असणार आहेत.

दरम्यान पूरपरिस्थिती मुळे अनेक भागांत वीज पुरवठा खंडीत होतो. सध्या हा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 80% वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम झालं आहे तर जेथे वीज अद्यापही रिस्टोअर करण्यात आलेली नाही तेथे सोलर लॅम्प्स देण्याचं काम सुरू आहे. Maharashtra Floods: चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी निधी मंजूर.

ANI Tweet

महाराष्ट्र सरकारच्या कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्तांना तात्पुरती मदत देण्यात आली आहे तर 15 दिवसांत संपूर्ण अहवाल आणि पंचनामा सादर केल्यानंतर पुढील मदत जाहीर केली जाईल असे सांगण्यात आले आहे. तसेच आता महाड मध्ये एनडीआरएफ चा कॅम्प बेस ठेवण्यासाठी देखील सरकार एक पाऊल पुढे आले आहे.