जिल्हास्तरीय खेळाडूंना वाढीव गुण (Archived, edited, representative images)

विद्यार्थ्यांमधील खेळाडूला गती मिळावी म्हणून काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने Open SSC Exam Board सुरू केले आणि आता जिल्हा तसेच डिव्हिजनल लेव्हलवर (District Sports Winners ) यशस्वी कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांना बोर्ड एक्झाममध्ये आता पाच अधिक गुण मिळणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्रालयाकडून  केली आहे. यापुर्वी केवळ राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांवर खास गुणांची बरसात होत असे आता हा फायदा जिल्हास्तरीय मुलांनाही मिळणार आहे. Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा

20 डिसेंबर 2018 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये केवळ राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या मुलांसाठी गुणांची घोषणा करण्यात आली होती मात्र त्यानंतर अनेकांनी पत्रव्यवहार करून हा फायदा जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांनाही मिळावा अशी मागणी केली होती. त्या सकारात्मक विचार करून शासनाने 5 वाढीव गुण देण्याची घोषणा केली आहे.

जिल्हास्तरीय कोणत्या स्पर्धा खेळणार्‍या मुलांना होणार फायदा?

जिल्हा स्तरावर यशस्वी कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना 5 वाढीव गुण देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यावेळेसच कोणकोणत्या स्पर्धां यासाठी ग्राह्य धरल्या जातील याचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नेहरू हॉकी कप, सुब्रतो मुखर्जी फूटबॉल टुर्नामेंट, भारताच्या पॅरेलॅंमिक कमिटीकडून आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मुलांसाठीच्या स्पर्धा यांचा समावेश करण्यात आला आहे. 5 वाढीव गुणांचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी सर्टिफिकेट्स ही जिल्हास्तरावर आयोजित केलेल्या आयोजकांची आवश्यक आहेत. त्यामध्ये वैयक्तित आयोजकांचा समावेश नसावा.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुलांमधील खेळाडू वृत्ती वाढेल तसेच अभ्यासाबरोबरच त्यांच्या कलागुण, इतर छंदांना चालना मिळेल. विद्यार्थ्यांमधील खेळाडू जोपासला जाईल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.