Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara) आणि राज्यातील विविध ठिकाणच्या पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा दिला. पुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या घरांची प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhanmantri Awas Yojna) पुनर्बांधणी करण्यात येईल. तसेच, यासोबतच ग्रामीण भागात 2400 तसेच शहरी भागात सुमारे 36000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकासनीची भरपाई म्हणून 1 हेक्टरवरील कर्ज माफ केले जाईल अशी, माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे दिली. आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ज्या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्याचं एक हेक्टर पर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. शेतकऱ्याला नियमाने जे कर्ज मिळतं ते माफ करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. जसे की, एखाद्या शेतकऱ्याने ऊसाची लागवड केली असेल आणि त्याचे नुकसान झाले असेल तर, आम्ही त्याला नियमाने मिळणारं अधिकाधिक (एक हेक्टर) कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ज्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झालं आहे. मात्र, त्याने कोणतेही कर्ज घेतले नाही. तर, अशा शेतकऱ्यांनाही नियमानं जी भरपाई मिळते त्याच्या तिप्पट भरपाई राज्य सरकार देणार आहे, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

एएनआय ट्विट

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ज्या नागरिकांची घरं पुराच्या पाण्यामुळे कोसळली आहेत अशा नागरिकांना घरं उभारणीसाठी राज्य सरकार मदत करणार आहे. त्यासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरुम दिला जाईल. तसेच, ज्या छोट्या व्यापाऱ्यांचं पुरामुळे नुकसान झालं आहे त्यांच्यासाठीही प्रत्येकी 50 हजार रुपयांपर्यंतची मदत राज्यसरकारतर्फे दिली जाणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Floods 2019: अमिताभ बच्चन यांच्याकडून पूरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार)

एएनआय ट्विट

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांच्याकडे विनंती केली जाईल की, पूरग्रस्त नागरिकांना आयटी रिटन फाईल करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात यावी. याबाबत राज्य सरकार अर्थमंत्रालयाशी लवकरच बोलेन असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यन, पुर ओसरल्यामुळे मदत कार्याला वेग आला आहे. मात्र, या काळात साथीचे रोग, महामारी पसरु नये यासाठी राज्य सरकार तातडीने पावले उचलेन असेही मुख्यमंत्री म्हणाले.