Republic Day 2021 (Photo Credit: ANI)

देशभरात उद्या 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन (Republic Day 2021) साजरा केला जाणार आहे. हा देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) आणि मुंबई महानगरपालिका इमारतीला (BMC) तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळच्या काळोखात मुंबईचे हे तिरंग्यातील रूप नागरिकांना सुखावत आहे. तर काहींनी ही दृष्ये आपल्या कॅमेर्‍यात कैद केली आहेत. देशावर करोनाचे सावट असले तरी यंदाचा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीय सज्ज झाला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या प्रत्येक राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुरस्कार वितरण हाही या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो. भारताचे राष्ट्रपती यादिवशी पद्म पुरस्कारांचे वितरण करतात. यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश असतो. हे देखील वाचा- PM National Bravery Award 2021: अभिमानास्पद! महाराष्ट्रातील 5 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

फोटो-

Republic Day 2021 (Photo Credit: ANI)

फोटो-

Republic Day 2021 (Photo Credit: ANI)

फोटो-

Republic Day 2021 (Photo Credit: ANI)

प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचे सर्व मुख्य कार्यक्रम हे देशाची राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरे केले जातात. राजपथावर भारताचा आणि त्याच्या विविधतेच्या गौरवार्थ एका भव्य पथसंचलनाचे आयोजन केले जाते.