Maharashtra CET PCM, PCB Result 2023 Date: एमएचटी सीईटी चा निकाल 12 जून दिवशी सकाळी 11 वाजता; cetcell.mahacet.org  वर पहा स्कोअरकार्ड
Result | Representative image (Photo Credit- Pixabay)

Maharashtra State Common Entrance Test Cell कडून आज (9 जून) Maharashtra Health and Technical Common Entrance Test अर्थात एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. यंदाचा MHT CET चा निकाल 12 जून दिवशी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर पाहता येणार आहे.

यंदाची सीईटीची परीक्षा पीसीएम ग्रुप साठी 9 ते 14 मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती तर पीसीबी ग्रुपची परीक्षा 15 मे ते 20 मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती. 26 मे दिवशी प्रश्नपत्रिका, रिस्पॉन्स शीट आणि आंसर की जारी करण्यात आली आहे. 28 मे पर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

MHT CET Result 2023 कसा पहाल ऑनलाईन?

  • cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
  • MHT CET Result 2023 Direct Link चा पर्याय शोधा.
  • त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल.
  • Maharashtra CET Result 2023 तुमच्या स्क्रिन वर दिसेल.
  • आता तुम्हांला निकाल पाहता येईल. हा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट देखील काढता येणार आहे.

MHT CET 2023 चा निकाल जाहीर होताच Maharashtra State Common Entrance Test Cell कडून पात्र विद्यार्थ्यांसाठी online MHT CET counseling 2023 ची सुरूवात केली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी यामध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. निकालासोबतच या परीक्षेमधील टॉपर्सची देखील नावं जाहीर केली जाणार आहेत. University of Mumbai Admission Schedule 2023: बारावीच्या निकालानंतर आता पदवीच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जारी; पहिली यादी 19 जूनला .

मागील वर्षी, पीसीएम ग्रुप मध्ये 13 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये 100% गुण मिळवले होते. तर पीसीबी मध्ये 14 विद्यार्थ्यांना परफेक्ट स्कोअर मिळवता आला होता.