MHT CET 2020 परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना HSC Board details अपडेट करण्यासाठी 23 मे पर्यंत मुदत; mhtcet2020.mahaonline.gov.in वर ऑनलाईन पेमेंटही करता येणार
Online Application | Photo Credits: Pixabay.com

MHT CET 2020 ची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना आता सीईटी सेलने HSC बोर्ड परीक्षेची माहिती त्यांच्या ऑनलाईन फॉर्मामध्ये भरण्यासाठी 23 मे पर्यंत मुदत दिली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अ‍ॅप्लिकेशन फी भरून फॉर्म सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यंदा महाराष्ट्र बोर्डाची 12 वीची परीक्षा 7 मार्च दिवशी संपली आहे. मात्र आता MHT CET cellने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पुन्हा पोर्टल ओपन केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी सारी माहिती 23 मे पर्यंत भरावी असं आवाहन केले आहे. JEE Mains 2020 Exam साठी नव्या विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्याची संधी; jeemain.nta.nic.in वर 24 मे पर्यंत करा रजिस्ट्रेशन

MHT CET cell च्या नोटिफिकेशननुसार, विद्यार्थ्यांनी मंडळाकडे यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे मात्र फी भरली नाही किंवा अ‍ॅप्लिकेशन फॉर्म सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्यांना फॉर्म सबमीट करण्याची पुन्हा संधी मिळावी अशी विनंती केली होती. त्यासाठी आता ऑनलाईन पोर्टल पुन्हा उघडण्यात आलं आहे. mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन MHT CET 2020 online application form साठी विद्यार्थ्यांना पेमेंट करता येईल. त्यासाठी त्यांचा रजिस्टर लॉगिंग आय डी वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

MHT CET 2020 परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांचे HSC डिटेल्स कुठे व कसे भरू शकणार?

महाराष्ट्र सीईटी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

होम पेजवर ‘Details of HSC Board’लिहलेल्या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर स्क्रीनवर नवं पेज ओपन होईल.

त्यानंतर तुम्हांला दिल्या जाणार्‍या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.

submit या पर्यायावर क्लिक करा आणि या फॉर्मची कॉपी तुमच्यासाठी सेव्ह करून ठेवा.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचं संकट पाहता राज्यातील सीईटीचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. आता जिल्हा स्तरावर होणारी ही परीक्षा तालुका स्तरावर घेतली जाणार आहे. लवकरच त्याचं नवं वेळापत्रक जाहीर केली जाणार आहे. टेक्निकल अ‍ॅग्रिकल्चरल, फार्मसी, अभियांत्रिकी शाखेमध्ये शिक्षण घेणार्‍यांसाठी सीईटीची परीक्षा घेतली जाते. Directorate of Technical Education च्या वतीने MHT CET ची परीक्षा महाराष्ट्र राज्यात घेतली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातात.