JEE Mains 2020 Exam Fresh Applications: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल (HRD Minister Ramesh Pokhriyal) यांनी आज (19 मे) विद्यार्थ्यांसाठी अजून एक दिलासादायक बातमी दिली आहे. दरम्यान यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे सारे जग ठप्प्प झालं आहे. यामधून विद्यार्थ्यांचीदेखील सुटका झालेली नाही. यंदा या संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांचे परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याचे प्लॅन देखील बाळगळले असतील. पण अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना आता सरकारने प्लॅन बी दिला आहे. यंदाची लांबणीवर पडलेली जेईई मेन्स (JEE Mains 2020 Exam) आणि अॅडव्हान्स ची परीक्षा पाहता आता विद्यार्थ्यांना 24 मे पर्यंत नवी अॅप्लिकेशन करण्यासाठी संधी दिली आहे. jeemain.nta.nic.in वर हे अर्ज सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नव्याने विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी रमेश पोखरियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, JEE Main ची यंदाची परीक्षा 18-23 जुलै दरम्यान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजूनही अभ्यास करून या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवत भारतात आघाडीच्या शिक्षणसंस्थेमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकतो. JEE Main and NEET 2020 Exams Dates: जेईई मेन्स यंदा 19-23 जुलै दरम्यान होणार, JEE Advanced ऑगस्ट तर NEET 2020 परीक्षा 26 जुलै दिवशी!
JEE Main 2020 Examination साठी कसा कराल ऑनलाईन अर्ज?
- jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- ‘Application Form for JEE Main (April)-2020’या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्ही रजिस्ट्रेशन केले असेल तर ‘Login to Apply’ वर क्लिक करा आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर फ्रेश युजर्स मध्ये ‘Proceed to Apply' वर क्लिक करा.
- अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये अत्यावश्यक माहिती भरा.
- काही माहिती तुम्हांला स्कॅन करून अपलोड करावी लागेल.
- ऑनलाईन फी भरल्यानंतर तुम्हांला ‘Submit’वर क्लिक करायचं आहे.
CBSE 10th,12th Board Exam Timetable: सीबीएसई बोर्डाचं दहावी, बारावीचं नवं वेळापत्रक जाहीर- Watch Video
दरम्यान अॅप्लिकेशन 24 मे दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुलं असेल. तर अत्यावश्यक गोष्टी, माहिती त्या दिवशी रात्री 11.50 पर्यंत सादर करण्याची विद्यार्थ्यांना मुभा असेल. जे विद्यार्थी जेईई मेन्स ची परीक्षा पास होतील त्यांना मेरीटनुसार जेईई अॅडॅव्हान्स परीक्षा देता येते. काल सीबीएसई बोर्डाचं देखील नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.