Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल, डिझेल दरकपातीबद्दल निर्णयाची शक्यता
Eknath Shinde | (Photo Credits: ANI)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक गुरुवार, 14 जुलै रोजी सुरू झाली. मीडिया रिपोर्टनुसार, राज्य मंत्रिमंडळ पावसाळा, आगामी सरपंच निवडणुका आणि इंधनाच्या दरांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या काही दिवसांत राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. 'महाराष्ट्रातील जनतेला' दिलासा देण्यासाठी त्यांचे सरकार इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करेल, असे विधानसभेच्या फ्लोअर टेस्ट जिंकल्यानंतर शिंदे यांनी घोषणा केली होती.