HSC SSC Exam Dates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या (HSC SSC Exam Dates) परिक्षांबद्दल मोठी घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील परीक्षांच्या तारखा महाराष्ट्र बोर्डाकडून (Maharashtra Board)जाहीर करण्यात आल्या आहेत. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवून परिक्षांसाठी तयार रहावे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात सुरू होते. तर दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केली जाते. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार परिक्षा पार पडल्यास त्याचा चांगला परिणाम पुढे कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रियेवर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होणार नाही. त्याशिवाय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल.
दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा :
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी, 2025 ते मंगळवार, दि. 18 मार्च 2025
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन
शुक्रवार, दि. 24 जानेवारी 2025ते सोमवार, 10 फेब्रुवारी 2025
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा
शुकवार, दि. 21 फेब्रुवारी, 2025 ते सोमवार दि. 17 मार्च, 2025
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन
सोमवार, 03 फेब्रुवारी 2025 ते गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025
परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचा अंदाज बोर्डाने वर्तवला आहे. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाईल.