प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

Maharashtra Board SSC, HSC Exam 2020 Schedule: महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, यंदा HSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 18 फेब्रुवारी तर SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 3 मार्च पासून सुरू होणार आहे. www.mahahsscboard.in ही महाराष्ट्र शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट असून यावर दहावी, बारावी आणि बारावी व्होकेशनल अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा मंगळवार 18 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू होऊन बुधवार 18 मार्च 2020 रोजी संपणार आहे तर दहावीची परीक्षा मंगळवार 3 मार्च 2020 रोजी सुरू होऊन सोमवार 23 मार्च रोजी संपणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेतली जाते.

 

या संकेतस्थळांवर पाहा संपूर्ण वेळापत्रक

दहावीचे संपूर्ण वेळापत्रक

बारावीचे संपुर्ण वेळापत्रक

बारावीचे व्होकेशनल परीक्षेचे संपुर्ण वेळापत्रक

हेदेखील वाचा-  Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोपे जावे व विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हे वेळापत्रक 4 महिने आधी जाहीर करण्यात येत असल्याचेही मंडळाकडून नमूद करण्यात आले आहे. हे संभाव्य वेळापत्रक असेल. छापील स्वरूपातील अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना नंतर देण्यात येईल, असेही पुढे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्य वेबसाइट्स, व्हॉट्सअॅप व इतर सोशल माध्यमांतून प्रसिद्ध वा व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.