नागपूरात (Nagpur) पार पडत असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session) आज दुसरा दिवस आहे. तरी गेल्या अधिवेशनाप्रमाणे आज हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) दुसऱ्या दिवशी विधानसभेत पुन्हा एकदा पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. शिंदे सरकार (Shinde Fadnavis Government) स्वतवरील ५० खोक्यांचा आरोप गेल्या सहा महिन्यात मोडू न शकल्याने आज पुन्हा एकदा विधानसभेत खोके सरकार हे विरोधकांचं ब्रीद वाक्यचं झाल्याचं भासलं. तरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधानसभा अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बैठकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत हजेरी लावली.

 

महाविकास आघाडीची बैठक संपताच महाविकास आघाडीचे नेते राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत विधान भवन परिसरात पोहोचले आणि परिसरात चौहूबाजूंनी ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. तोच तेवढ्यातच भाजपच्या पक्ष कार्यालयातून भाजप आणि शिंदे गटाचे आमदार 'भारत माता की जय'च्या च्या घोषणा देत विधान भवनाच्या पायऱ्यांवर पोहोचले. तर बघता बघता राज्य सरकार आणि विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये घोषणेची स्पर्धाच रंगली. (हे ही वाचा:-Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारने 52,327 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या)

 

विधान परिषदेत कामकाजाला सुरुवात झाली आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू असून गोंधळ उडाला आहे. तसेच दरम्यान विविध महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. तर राज्यात गेल्या 9 महिन्यात तब्बल 2138 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन या प्रकरणांपैकी 1159 प्रकरणे जिल्हा समितीने मदतीसाठी पात्र ठरवली आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.