महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: वरळी मध्ये EVM मध्ये बिघाड; बूथ क्रमांक 62 मधील सदोष यंत्र बदलून पुन्हा मतदानाला सुरूवात
Elections | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबईसह महाराष्ट्रामधे आज (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणूक मतदान सुरू आहे. दरम्यान ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान सुरू आहे. वरळी विधानसभा संघात आज मतदानादरम्यान पोलिंग बूथ नंबर 62 मध्ये ईव्हिएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. मात्र ANIदिलेल्या वृत्तानुसार बिघाड झालेले ईव्हिएम मशीन बदलण्यात आले असून पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली आहे. दरम्यान आज दिवसभर राज्यात 65 विविध ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची तक्रार कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलं आहे.

वरळी विधानसभा मतदार संघ यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील हाय प्रोफाईल मतदार संघांपैकी एक आहे. ठाकरे कुटुंबीयांचा पहिलाच सदस्य यंदा आदित्य ठाकरेच्या रूपाने निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. आदित्य ठाकरे यांना निवडणूकीमध्ये आव्हान देण्यासाठी बिग बॉस मराठी 2 फेम अभिजीत बिचुकले देखील रिंगणात उतरले आहेत. शनिवार ( 19 ऑक्टोबर) दिवशी वरळी विधानसभा मतदार संघात वांद्रे- वरळी सीलिंकच्या चेक पोस्टवर सापडले होते.

ANI Tweet  

आज सकाळपासुन शहरी भागामध्ये संमिश्र प्रतिसादामध्ये निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. तर 24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निकाल जाहीर केला जाणार आहे.