Maharashtra Assembly Elections 2019 Dates: महाराष्ट्र्र विधानसभा निवडणुक तारखा आज जाहीर होण्याची शक्यता;निवडणूक आयोग आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडणार पत्रकार परिषद
Elections | Image used for representational purpose | (Photo credits: PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2019) पूर्व राज्याचा आढावा घेण्यासाठी काल मुंबई (Mumbai) मध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोग (National Election Commission Of India) मुख्य आयुक्त सुनील अरोरा (Sunil Arora), आयुक्त अशोक लवासा (Ashok Lavasa) आणि सुशील चंद्रा (Sushil Chandra) दाखल झाले होते. आज (18 सप्टेंबर) रोजी सकाळी सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे राजकीय पक्षांसमवेत तर दुपारी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. प्राप्त माहितीनुसार या मिटींग्स आटोपल्यावर आज संध्याकाळी 6.15 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार असून यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.राज्याची एकूण लोकसंख्या पाहता यंदा महाराष्ट्रात निवडणूक ही दोन टप्प्यात घेतली जाऊ शकते.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार निवडणूक तारखा जाहीर झाल्यावर तयारीसाठी निदान 35 दिवसांचा कालावधी असणे आवश्यक असतील, तसेच दिवाळीपूर्वी निवडणूकांचे काम पूर्ण करायचे आहे.' असे सांगण्यात आले होते. याशिवाय आता सत्तेत असणाऱ्या सरकारचा कार्यकाळ सुद्धा येत्या 9 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे, त्यानुसार निवडणूक घेऊन नियोजित वेळेत नवीन सरकारची स्थापना होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभुमीवर अलीकडेच राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवडणुक संबंधी सूचनापत्र जारी करण्यात आले असून राज्यातील निवडणूक कार्यात सहभागी अधिकाऱयांच्या विषयी देखील खास सूचना नमूद करण्यात आल्या आहेत.(Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूक लढवावी की नाही? मनसे पेचात)

दरम्यान, यापूर्वी अनेक राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी तसेच राजकीय विश्लेषकांनी सुद्धा निवडणूक तारखांच्या संदर्भात अंदाज वर्तवले आहेत. 2014 च्या निवडणुकांचे वेळापत्रक पाहता महाराष्ट्रात साधारण 20 सप्टेंबरच्या सुमारास निवडणुकांची घोषणा झाली होती, तसेच 15 ऑक्टोबर रोजी मतदान घेऊन 19 ऑक्टोबर रोजी निकाल घोषित करण्यात आले होते. यंदा मागील काही काळापासून गणेशोत्सवाच्या नंतर आचारसंहिता लागू होणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.