Arogya Vibhag Nokar Bharati: राज्य सरकारकडून आरोग्य विभागासाठी बंपर भरतीची घोषणा, आज पासून भरती प्रकियेला सुरवात
health department exam 2023

Arogya Vibhag Nokar Bharati: महाराष्ट्र राज्यात आज पासून (२९ ऑगस्ट) आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया होणार आहे. राज्य सरकारने 10 हजार 949 पदांच्या बंपर भरतीची घोषणा केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य विभागातील पद भरती रखडले होते. आज पासून या पद भरतीला सुरुवात होणार आहे, राज्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीत वेगवेगळ्या विभागासाठी पद भरती होणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांनी या भरतीची घोषणा केली.

आरोग्य सेवकांच्या क आणि ड  वर्गासाठी ही भरती होणार आहे. एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या  10 हजार 949 पदांच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांनी केली आहे.  ’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

आरोग्य विभागात कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याने ही भरती होणार असल्याची माहिती मिळाली.  गट क' संवर्गात प्रयोगशाळा तंत्रज्ञ,परिचारिका, आरोग्यसेवक, लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर 'गट ड' संवर्गात सफाई कामगार, शिपाई, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.