मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Holi 2019 (File Photo)

Holi 2019:  होळीचा सण म्हटला की उंच होळ्या, रंगाची उधळण आणि पुरणपोळ्यांवर ताव हे आलेच. मात्र यंदा हे सेलिब्रेशन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) थोड्या हटके अंदाजात केलं आहे. यंदा ' होळी लहान पोळी दान' या थीमवर होळीचं सेलिब्रेशन करण्यात आलं. मुंबईकर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोळी दान कार्यक्रम हाती घेतला होता. यामध्ये मुंबईकरांना पोळी दान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं होत. त्याला नेहमीप्रमाणेच मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ग्रँट रोड ते विरार पर्यंत मुंबईकरांनी होळीमध्ये पुरणपोळी दान करण्याऐवजी ती समाजातील गरजुंना दान केली. या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र अंनिस दहिसर शाखेतर्फे करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. Holi Special Recipe: होळी नैवेद्यासाठी 'पुरणपोळी' करताना पुरण न वाटता बनवण्यासाठी खास एक्सपर्ट टीप्स (Watch Video)

मुंबईमध्ये यंदा एच आय व्ही बाधितांसोबत 'रंग बरसे' हा कार्यक्रम रंगला. तर दादर येथे अंध मुलींच्या शाळेमध्ये नैसर्गिक रंगामध्ये होळीचा सण साजरा करण्यात आला. आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहात धुलिवंदनाचा सण रंगला.