Sikh youth broke gates of Gurudwara in Nanded (Photo Credits: ANI)

कोविड-19 (Covid-19) निर्बंधाचे उल्लंघन करणारी एक घटना राज्यातील नांदेड (Nanded) जिल्ह्यातून समोर येत आहे. नांदेड मध्ये शीख तरुणांनी गुरुद्वाराचे (Gurudwara) दरवाजे तोडण्याचा तोडले आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यात 4 पोलिस जखमी झाले असून वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे, अशी माहिती नांदेडचे एसपी (Nanded SP) यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णावाढीमुळे शीखांच्या होला मोहल्ला (Hola Mohalla) साठी परवानगी नाकारण्यात आली होती. यासंबंधिची माहिती गुरुद्वारा समितीला देण्यात आली होती. परंतु, 'होला मोहल्ला आम्ही गुरुद्वाराच्या आतच करु', असे समितीचे म्हणणे होते. मात्र संध्याकाळी 4 वाजच्या दरम्यान, निशान साहिब यांना गेटवर आणले असता तेथे वादावादी सुरु झाली. सुमारे 300-400 शीख तरुणांनी गुरुद्वाराचा गेट तोडत बाहेरच्या दिशेने धाव घेतली. तसंच त्यांनी पोलिसांवर हल्लाही केला. यात 4 पोलिस जखमी झाले असून काही गाड्यांचे नुकसान देखील झाले अशी माहिती नांदेडचे एसपी यांनी दिली आहे.

ANI Tweet:

दरम्यान, आज राज्यात 31,643 नवे रुग्ण आढळून आले असून 102 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20,854 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 3,36,584 सक्रीय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले असून लॉकडाऊनचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.