ठाणे ग्रामीण मध्ये वीज कोसळण्याच्या दोन दुर्घटना; एकाचा मृत्यू, 26 जण जखमी
Lightning Strikes | Representational Image (Photo Credits: Pixabay)

वीज कोसळण्याच्या दोन घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातून समोर येत आहेत. एका दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत 26 जण जखमी झाले आहेत. ग्रामीण ठाण्यातील (Rural Thane) ही घटना आहे. पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, वीज कोसळून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना ठाणे जिल्हातील उत्तन (Uttan) भागात घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रिपोर्टनुसार, हा मुलगा समुद्रकिनारी खेळत असताना वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला.

काल संध्याकाळपासूनच ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावासाने हजेरी लावली होती. मेघगर्जनेसह वीजाही कडाडत होत्या. अशा वेळी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते. थोडीशी बेपर्वाई जीवावर बेतू शकते. गेल्या आठवड्यात पुणे, मुंबई, सोलापूर सह राज्यभर मुसळधार पाऊस झाला. रिपोर्ट्सनुसार, सोलापूर मध्ये तब्बल 8000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत पुण्यात 3 जण वाहून गेले. तर मुंबईतील एकजण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. (Pune Rains Update: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शरद पवार यांची बारामती तुडूंब, अनेक घरांत पाणी शिरले, इंदापूरात 40 जणांचे प्राण वाचवले)

ANI Tweet:

28 सप्टेंबरपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. परंतु, परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे घरात पाणी शिरणे, शेतीचे नुकसान होणे, भिंत कोसळून मृत्यू होणे अशी विविध दुर्घटनांची मालिका सुरु झाली.