महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई अर्थात महानंद (Mahananda Dairy) आता इतिहास जमा झालेला आहे. महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे (Mother Dairy) देण्यात आला आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया 2 मे रोजी पूर्ण झाली आहे.  मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद डेअरी इतिहास जमा झाली आहे. महाराष्ट्रातील या प्रसिद्ध डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीने ताबा मिळवला आहे. (हेही वाचा -  BEST Complet 150 Years: बेस्टला 150 वर्षे पूर्ण! मुंबईकरांना प्रदर्शनातून अनुभवता येणार आजपर्यंतचा ट्राम युगचा इतिहास (Watch Video))

महानंद डेअरीचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात ला आहे. ही हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या हस्तांतरणाची प्रक्रिया 2  मे रोजी पूर्ण झाली आहे. तसेच मदर डेअरीला राज्य सरकारकडून महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार असल्याची माहिती मिळत आहे. मदर डेअरी ही राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळाकडून चालवली जाते.

महानंद संस्था एनडीडीबीब म्हणजेच राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्यामध्ये प्रमुख अडसर हा महानंदचे संचालक मंडळ हा होता. गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळानं महानंदला संचालक मंडळ नको असल्याबाबतची अट घातली होती. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह संचालक मंडळानं राजीनामा दिला होता.