'महानंद'चे दुध महागले; येत्या 4-5 दिवसात नवी दरवाढ लागू, दूध न उचलण्याचा वितरकांचा इशारा
महानंद दुध (Photo Credit : YouTube)

मुंबईमध्ये 1 एप्रिल पासून म्हशीचे दोन रुपयांनी महागले होते. त्यानंतर अमूल, गोकुळ, मदर डेअरी यांनीही आपल्या दुधाच्या किंमती वाढवल्या होत्या. आता यांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रातील एk लोकप्रिय दुध उद्पादक संघ ‘महानंद दुध’ (Mahanand Dairy) नेही आपल्या दुधाचा दर वाढवला आहे. डेअरी संचालकांची एक महत्वाची बैठक नुकतीच पार पडली, या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला 27 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बढीव बोजाचा ताण सहन करण्यासाठी दुधाच्या दारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सामना या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

डेअरीचे उपाध्यक्ष डी.के. पवार यांनी याबद्दल माहिती दिली आहे. येत्या 4-5 दिवसांमध्ये हा वाधीद दर लागू होण्याची शक्यता आहे. सध्या महानंद दुधाची मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात साधारण दोन लाख लिटरची विक्री होत आहे. मात्र आता दुधाचा दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे दुधाचे वितरण परवडणार नसल्याचे महानंद दूध वितरक आणि वाहतूकदार संघाने स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: म्हशीच्या दूध दरामध्ये 1 एप्रिल पासून 2 रूपयांनी वाढ; मुंबई, ठाणे येथील नवे दूध दर काय?)

दरम्यान याआधी महानंद डेअरीमध्ये 2005 ते 1015 या काळात पैशांचा गैरव्यवहार झाल्याची घटना समोर आली होती. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे डेअरीची फार मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 58 जणांना नोटीसा जारी केल्या होत्या.