CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्तावित विस्तार येत्या 30 डिसेंबर दिवशी होणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आज दिली आहे.दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडाळाचा विस्तार कधी होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. दरम्यान यापूर्वी 24 डिसेंबरला हा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी मीडीयामध्ये चर्चा होती. मात्र हा लांबणीवर पडला होता. राज्यात एकही डिटेंशन सेंटर होणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला स्थगिती दिली.
राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूर येथे नुकतेच पार पडले. एकूण सहा दिवस चाललेल्या या मंत्रिमंडळाला राज्य सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांच्या सहाय्याने सामोरे गेले. आता अधिवेशन संपले असून मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या विस्तारात शिवसेना - 13 मंत्री (कॅबिनेट 10, राज्यमंत्री 3), राष्ट्रवादी- 13 मंत्री (कॅबिनेट 10, राज्यमंत्री 3), काँग्रेस-10 मंत्री (कॅबिनेट 8, राज्यमंत्री 2) मंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर झालेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणत्या दिग्गजांचा तसेच तरूण चेहर्यांपैकी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.