Madhyam Mahotsav: मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात (Sathaye College) अनेक वर्षापासून जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाकडून माध्यम महोत्सवाचे (Madhyam Mahotsav) आयोजन केले जात आहे. यंदा डिसेंबरच्या 15,16, 17 या तीन दिवसांत माध्यम महोत्सव रंगणार आहे. ढोल ताशाच्या गजरात माध्यम महोत्सवाच्या फलकाचे अनावरण झाले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, उप प्राचार्य दत्तात्रय नेरकर, उप प्राचार्य श्रीमती प्रमोदिनी सांवत आणि जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख गजेंद्र देवडा, प्रा. नारायण परब आणि प्रा. रसिका सांवत यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी माध्याम महोत्सवाची झलक दाखवली.
विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी साठ्ये महाविद्यालयाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे विविध संकल्पनांवर आधारित माध्यम महोत्सव साजरी करते. यंदाचा माध्यम महोत्सव भारतीय संस्कृती: जनत समृध्दीचे वारसा परंपरेचा या संकल्पनेची जोड देणार आहे. या महोत्सवात महाविद्यालायत अनेक कला सादर केले जाणार आहे. नृत्य, संगीत, पोस्टर मेकिंग, मिमिक्री, स्डॅअप कॉमेडी, रांगोळी तसेच शॉर्टफिल्मचे आयोजन करण्यात येणार आहे.(हेही वाचा- जनतेच्या पसंतीला उतरत आहेत 'खादी' ब्रँड्स
पहा माध्यम महोत्सवाची झलक
विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स हे या माध्यम महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. दरवर्षी माध्यम महोत्सवात दिग्गज मंडळींचा सहाभाग लाभतो, तर यंदा माध्यम महोत्सवात कलाकारांची मांदियाळी असणार आहे.