लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. वरवर सर्व काही शांत दिसत असले तरी सर्वच पक्षांकडून मतदारसंघनिहाय मोर्चबांधणीस सुरुवात झाली आहे. खास करुन महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मागच्या काही काळापासून बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अद्याप कोणीही अधिकृतपणे बोलत नसले तरी आखणी, डावपेच सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची I-N-D-I-A आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकासआघाडी, याच्यात मोठ्या प्रमाणावर रणनिती आखली जात आहे. खास करुन मुंबईमध्ये आसलेल्या जागांसाठी सध्यास्थितीत चर्चा सुरु असल्याचे समजते. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी शिवसेना (UBT) गट चार जागांवर इच्छुक आहे. तर उर्वरीत दोन जागा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला सोडण्याचा ठाकरे गटाचा विचार आहे. अर्थात, यावर कोणीही अधिकृत भाष्य केले नसले तरी राजकीय वर्तुळतील सूत्रे मात्र याबाबत माहिती देत आहेत.
मुंबईमधील विधानसभा मतदारसंघ
- बोरीवली विधानसभा मतदारसंघ
- दहिसर विधानसभा मतदारसंघ
- मागाठणे विधानसभा मतदारसंघ
- कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ
- चारकोप विधानसभा मतदारसंघ
- मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मुंबईतील चार जागांवर शिवसेना उमेदवार निवडून आले आहेत. (ज्यातील काही आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत) उर्वरीत दोन जागांवर भाजप उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतर्गत बंडामुळे बरेच जागावाटपात बरेच फेरबदल होतील, अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटातील अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतील विद्यमान खासदार आहेत. दुसऱ्या बाजूला उत्तर पश्चिम लोकभेसाठी अमोल किर्तीकर यांच्यावर उद्धव ठाकरे गट डाव लावण्याचा विचार करतो आहे. दक्षिण मध्य मुंबईतील जागेवरुन शिंदे गटासोबत गेलेले राहुल शेवाळे विद्यमना खासदार आहेत. या ठिकाणी ठाकरे गट उमेदवार द्यायच्या विचारात आहे.
दरम्यान, युतीच्या जागावाटपात (2019) इशान्य मुंबईची जागा भाजपसाठी सोडण्यात आली होती. याठिकाणावरुन मनोज कोटक निवडून आले होते.या ठिकाणी उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही. मात्र, ईशान्य मुंबईत असलेल्या मराठी मतदारांचा विचार करता या ठिकाणावरुन ठाकरे गट राज्यसभेचे विद्यमान खासदार संजय राऊत मैदानात उतरु शकतात, अशी चर्चा आहे.
मुंबीतील एकूण सहा जागांसाठी महाविकासआघाडीमध्ये 41-1 असे सूत्र ठरण्याची शक्यता आहे. अर्थात महाविकासआघाडीकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यात आले नाही. मात्र, लवकरच सूत्रातील स्पष्टता येण्याची शक्यता आहे.