Lok Sabha Elections 2019: गडचिरोली (Gadchiroli) येथे लोकसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी पहिल्या टप्पा पार पडला. त्यावेळी नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो यांच्यावर हल्ला केला होता. परंतु उद्या फेरमतदान पार पडणार असल्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत.
नक्षलवाद्यांनी अत्यंत दुर्गम भागातील वाघेझरी येथए मतदान केंद्राजवळ भुसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामुळे मतदान करताना अडथळा आला होता. नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे न झालेल्या गडचिरोलीत पुन्हा 15 एप्रिल रोजी चार मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील एटापल्ली तालुक्यात चार मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याचे निवडणुक आयोगाने सांगितले आहे.(हेही वाचा-गडचिरोली: सी-60 कमांडो पथकावर नक्षलवादी हल्ला, 3 जवान जखमी; मतदान संपल्यावर घडली घटना)
एटापल्ली मधील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी आणि वांगेतुरी या गावांचे मतदान होणार आहे. तर उद्या सकाळी 7 ते 3 यावेळात मतदान होणार आहे. गट्टा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदान पार पडणार आहे. नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यामुळे त्यावेळी मतदान पार पडले अ,सल्याने कडक सुरक्षाव्यवस्थेत मतदान होणार आहे.