Lok Sabha Elections 2019 Phase 3 Voting: देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणूकीचे नगारे वाजत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि मतदानाबाबतची उदासिनता दूर करण्यासाठी दिग्गजांसह, अनेक कलाकार मंडळींनी वारंवार मतदानाचे आवाहन केले. मात्र कलाकार मंडळींनी केवळ आवाहन न करता मतदान करुन आपला हक्क बजावत आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. यात सुबोध भावे (Subodh Bhave), सुयश टिळक (Suyash Tilak), मुग्धा गोडसे (Mugdha Godse), सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) यांच्यासह अनेक मराठी कलाकारांचा समावेश आहे.
मराठी कलाकारांचे मतदान:
सुबोध भावे
सुयश टिळक
मुग्धा गोडसे
आर्या आंबेकर
सोनाली कुलकर्णी
View this post on Instagram
Happy voting Maharashtra 😎 #LokSabhaElections2019 #लोकसभानिवडणूक #Phase3 #VotingRound3 #VoteKar
गायत्री दातार
आज राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडेल. तर चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, सोमवारी होणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर जनतेचा कौल लक्षात येईल.