Lok Sabha Elections 2019: नंदुरबार मध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, भरत गावित यांना तिकीट नाकरल्याने माणिकराव गावित नाराज; 'भाजप' ला करणार मदत?
Manikrao Gavit (Photo Credits: Facebook)

Nandurbar Lok Sabha Constituency: कॉंग्रेसला महराष्ट्रामध्ये अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सलग 9 वेळेस खासदार म्हणून निवडून आलेल्या माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांच्या मुलाला भरत गावित (Bharat Gavit) यांना   कॉंग्रेसने तिकीट नाकरल्याने गावित कुटुंब नाराज झाले आहे. या नाराजीमध्ये गावित कॉंग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. नंदूरबारमधून (Nandurbar Constituency) गावित कुटुंबाने कॉंग्रेसचि साथ सोडल्यास हा कॉंग्रेस पक्षासाठी खूप मोठा धक्का समजला जाणार आहे. Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक

ANI ट्विट

नंदूरबारमध्ये माणिकराव गावित यांचा मुलगा भरत गावित खासदारकीसाठी इच्छुक आहेत. मात्र कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी भरत गावित यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. भरत गावित ऐवजी कॉंग्रेसने केसी पाडवी यांना तिकीट जाहीर केलं आहे. तर भाजपाकडून हीना गावित यांना नंदूरबारमध्ये तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

नंदुरबार हा आदिवासीपट्टा काँग्रेसचा पांरपारिक बालेकिल्ला मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी, सोनिया गांधी या नंदुरबारमधून करीत होत्या. मात्र आता नाराजीनाट्यामुळे कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडण्याची शक्यता आहे.

माणिकराव गावित आता कॉंग्रेसविरुद्ध भाजपाला मदत करणार की भरत गावित अपक्ष म्हणून उभे राहणार याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असे सांगण्यात आले आहे.