Lok Sabha Elections 2019: देशात लोकसभा निवडणूकीचा आज चौथा टप्पा पार पडत आहे. तर महाराष्ट्रात अंतिम टप्प्यातील मतदानाची प्रक्रीया आज पार पडेल. महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी, नंदूरबार या 17 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. राजकीय नेते, बॉलिवूड स्टार्स, मराठी कलाकार, खेळाडू यांच्यासह सामान्य नागरिक मतदानाबाबत उत्सुक दिसले. जाणून घेऊया दुपारी 1 वाजेपर्यंत राज्याच्या 17 मतदारसंघात किती टक्के मतदान झाले... (मतदानाचे LIve Updates जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा)
दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी:
Voter turnout till 1 pm in #Maharashtra #MumbaiVotes pic.twitter.com/E17IqXl3le
— Tanushree Venkatraman (@tanushreevenkat) April 29, 2019
आज महाराष्ट्रातील मतदान प्रक्रीया पार पडेल. देशात मात्र अजून 3 टप्प्यातील मतदान होणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर जनतेचा कौल लक्षात येईल.