Lok Sabha Elections 2019: पोस्टरबाजीवरुन युवासेना नाराज झाल्याने पुनम महाजन यांची 'मातोश्री'वर धाव
Poonam Mahajan (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मध्य भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर निवडणुक प्रचारासाठी उत्तर मध्य मुंबईसाठी पोस्टर छापण्यात आले. परंतु या पोस्टरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा फोटो पोस्टरवर नसल्याने युवासेनेमध्ये नाराजगी पसरली होती. तसेच पुनम महाजन जो पर्यंत त्यांची चुक मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी प्रचार करणार नसल्याची भुमिका युवासैनिकांनी घेतली होती.

पुनम महाजन यांनी केलेली चुक मान्य करावी अशी अट युवासेनेने घातली होती. तसेच त्यांच्यासाठी प्रचारसुद्धा करणार नाही असे सांगण्यात आले होते. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीची गोष्ट घडणे खेदजनक आहे. म्हणून युवासैनिकांची नाराजी दूर करण्यासाठी पुनम महाजन अखेर मातोश्रीवर पोहचल्या आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र राज्य सरकार कडून लोकसभा निवडणुक मतदान दिवशी सुट्टी जाहीर; पहा कोणा कोणाला लागू असेल सुट्टी)

महायुतीच्या बॅनरवरील नेत्यांमध्ये आदित्य ठाकरे यांचा फोटो नव्हता. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी वांद्रे येथील सेनेच्या शाखेत पूनम महाजन यांचा निषेध करणारी बैठक आयोजित केली होती. यावेळी युवासेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर आदित्य ठाकरे हे युथ आयकॉन असून त्यांचा फोटो पोस्टरवर न लावणे हा त्यांच्यासह आमचा अपमान असल्याचे युवासैनिकांनी यावेळी म्हटले आहे.