Lok Sabha Election 2024 : मराठा समाजाच्या बैठकीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण; उमेदवारांकडून पैसै घेतल्याचा आरोप
Photo Credit -X

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मराठा समाज (Maratha Community) चे उमेदवार देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मध्ये बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यात दोन गटातील झालेल्या मतभेदांमुळे प्रचंड राडा झाला. एकीकडे राजकारणी एकमेकांवर आरोप करत असताना राज्यात मराठा समाजाच्या बैठकीतही (Maratha Community Meeting)आरोप प्रत्यारोप झाले. नंतर त्याचे रुपांतर जोरदार हाणामारी (Fighting)त झाले. देन्ही गटांनी उमेदवारांकडून पैसे घेतल्याच्या आरोप केले. त्यामुळे सगळा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर )

याच बैठकीत महिला कार्यकर्त्या देखील उपस्थिती होत्या. बैठक सुरु असतानाच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शहरातील मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजाच्या बांधवांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या गोंधळामुळे ही बैठक स्थगिक करण्यात आली. या हाणामारीनंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा पोहोचला. पोलिसांकडून घटनास्थळी शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.(हेही वाचा:Lok Sabha Elections 2024: तब्बल 238 वेळा हरूनही मानली नाही हार; तामिळनाडूचे K. Padmarajan पुन्हा एकदा रिंगणात उतरणार, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले नाव )

या राड्यानंतर मराठा समाजाकडून संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विकी पाटील,बाळू औताडे अशी काही तरूणांकडून मारहाण झाल्याचे समोर येत आहे. यांच्याशिवाय अन्यही काही लोक आहेत. पोलीस सध्या तपास करत आहेत. कोणी कोणाच नाव घेऊन बोलायच नाही, असं ठरलेलं. काही मतभेद असतील, तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायच असं ठरलेलं. मात्र काही जणांची नाव पुढे आली आहेत. त्यावरुन वादावादी झाली, असं समोर आलं आहे.