देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी ही सुरु असून अनेक मोठे नेते, बॉलिवुडचे कलाकार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक नंदेश उमप हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. नंदेश उमाप यांनी ईशान्य मुंबईमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नंदेश उमप यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने ईशान्य मुंबईमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (हेही वाचा - Sanjay Nirupam Rejoins Shiv Sena: कॉंग्रेस ला राम राम ठोकलेल्या संजय निरूपम यांचा आज पत्नी, मुलीसह पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश)
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात महायुतीचे ळोल आणि महाविकास आघाडीचे संजय पाटील हे उमेदवार असून आता या ठिकाणाहून नंदेश उमप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणची लोकसभा मतदार संघांची लढत ही तिरंगी होण्याची शक्यता आहे. कलाकार म्हणून नेहमीच समाजाचे प्रबोधन करत असतो. आता वेगळी इनिंग आपण खेळली पाहिजे, याच हेतून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी नंदेश उमप यांनी दिली.
नंदेश उमप हे ख्यातनाम लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आहेत. विक्रोळी कन्नमवार नगर ही त्यांची कर्मभूमि आहे. नंदेश यांच्या नावाची साधी चर्चाही या मतदारसंघात नव्हती. मात्र अर्ज भरुन त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्रारंभी या मतदारसंघात प्रामुख्याने लढत महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांच्यात अपेक्षित होती. मात्र वंचित आणि बसपाचे उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत रंग भरला आहे.