प्रजासत्ताक लोकराज्य पार्टी (Lok Rajya Party) सर्वेसर्वा अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी बहुजन समाज पार्टीत (BSP) प्रवेश केला आहे. बसपा महाराष्ट्र (BSP Maharashtra) प्रभारी राज्यसभा सदस्य अशोक सिध्दार्थ, प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी मुबंईत ही माहिती दिली. अनिल महाजन यांची बसप महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणूनही नियुक्ती झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
अनिल महाजन यांनी बी.एस.पी भवन चेंबूर येथे बहुजन समाज पार्टमध्ये शुक्रवारी (२६ एप्रिल २०१९) रोजी जाहीर प्रवेश केला. अनिल महाजन यांचा राज्यभरात संपर्क आहे. अतिशय कुशल संघटन यांचे आहे. हाडाचा समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून यांच्या नेतृत्वात बहुजन समाज पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो, अशी भावना बसपा नेत्यांनी या वेळी व्यक्त केली. मुंबई येथील चेंबूर बसपा प्रदेश कार्यालय बी एस पी भवन येथे हा पक्षप्रवेश पार पडला. (हेही वाचा, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'जय महाराष्ट्र' म्हणत बांधले शिवबंधन)
अनिल महाजन यांनी राज्य सभा सदस्य (उत्तर प्रदेश) महाराष्ट्र राज्य प्रभारी अशोक सिद्धार्थ व राज्य प्रभारी प्रमोद रैनाजी, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांच्या उपस्थितीत बसपात जाहीर प्रवेश देण्यात केला. या वेळी अनिल बाबुलाल महाजन यांची बसपाच्या मुख्य कार्यकारणीत महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्तीही करण्यात आली. या वेळी राज्य प्रभारी प्रमोद रैनाजी ,प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे उपस्थित होते.