Local Train Services Disrupted: भिवपुरी (Bhivpuri) जवळ ओव्हरहेड उपकरणाचा ब्रॅकेट आर्म (Equipment Bracket Arm) तुटल्याने मध्य रेल्वेची (Central Railways) कर्जत ते बदलापूर (Karjat and Badlapur) दरम्यानची डाऊन मार्गावरील उपनगरीय सेवा (Suburban Services) मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. त्यामुळे विभागात अनेक लोकलला विलंब झाला.
सकाळी 07:23 वाजता, कर्जत ते सीएसएमटी उपनगरीय ट्रेन ब्रॅकेट तुटल्यामुळे थांबली. त्यानंतर सकाळी 07:30 वाजता दुरुस्तीच्या कामासाठी ओव्हरहेड उपकरणाची वीज बंद करण्यात आली. परिणामी, कर्जत ते बदलापूर अप सेक्शनवर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या. तथापी, डाऊन कल्याण ते कर्जत विभागातील गाड्या सुरू आहेत. (हेही वाचा -Mumbai Local Train Problem: मुंबई लोकल ट्रेन प्रवास, नियमीत समस्यांमुळे प्रवासी हैराण; तुम्हालाही होतो का असा त्रास? घ्या जाणून)
कर्जत ते सीएसएमटी लोकल कर्जत-भिवपुरी सेक्शनमध्ये खोळंबली असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याशिवाय, कर्जत ते सीएसएमटी ही दुसरी लोकल कर्जतमध्ये रोखण्यात आली आहे. 11010 पुणे ते CSMT सिंहगड एक्स्प्रेस सेवा कर्जतजवळ खोळंबली आहे. याचा परिणाम उपनगरीय सेवांवर झाला आहे. (हेही वाचा -(हेही वाचा, Virar To Churchgate AC Local Viral Video: खचाखच भरलेली एसी लोकल मीरारोड स्थानकातून दरवाजा बंद न करताच धावली; व्हिडीओ वायरल (Watch Video))
दरम्यान, प्रवाशांना परिस्थितीबाबत अपडेट राहण्याचा आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रेल्वे सेवा पुनर्संचयित करण्याचे काम सध्या सुरू आहे. अधिकारी शक्य तितक्या लवकर समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहेत.