वाचन प्रेरणा दिन :डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आजपासून फिरते ग्रंथालय सुरू
मध्य रेल्वे डेक्कन क्विन Photo credits: PIB

डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. अब्दुल कलाम यांचं जीवन सार्‍यांसाठी प्रेरणादायी आहे. लोकांना यादिवशी नवं साहित्य वाचण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध स्तरावर प्रेरणा दिली जाते. राज्य सरकारनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे. आजपासून मध्यरेल्वेमार्फत डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये मोफत फिरते वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेकडून खास सोय

मध्य रेल्वेच्या उपक्रमामध्ये आता मोफत फिरते वाचनालय ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमातर्गत डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते वाचनालय आणि वाचनदूत सेवा सुरू करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरपासून पासधारकांच्या डब्ब्यामध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे.

 

मुंबई ते पुणे धावणार्‍या डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्सप्रेसने नियमित अनेक चाकरमनी मुंबई ते पुणे असा प्रवास करत असतात. या नियमित 3 तासाच्या एका फेरीदरम्यान लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी याकरिता हा उपक्रम शासनाकडून सुरू करण्यात आला आहे.