Leprosy: अमरावती जिल्ह्यात कुष्ठरोग ठरतोय आव्हान? रुग्ण शोधमोहिमेत महत्त्वपूर्ण आकडेवारी
Health | Representational Image (Photo Credits: Pixabay)

एका बाजूला कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट असताना दुसऱ्या बाजूला कुष्ठरोग (Leprosy) आपले हातपाय पसरवत असल्याचे पुढे येत आहे. अमरावती (Amravati District) जिल्ह्यातील धामनगाव तालुका आरोग्य विभागाने नुकतीच रुग्ण शोधमोहीम राबवली. या मोहिमेत नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीत तालुक्यात एकूण 1 लाख 5 हजार 603 नागरिकांची तपासणी केली. यात 415 संशयित क्षयरुग्ण, तर 383 संशयित कुष्ठरुग्ण, तर आढळून आले. या तपासणीसाठी साधारण 119 पथके नेमण्यात आली होती.

प्राप्त माहितीनुसार 8 व्यक्तींवर कुष्ठरोग आणि चार जणांवर क्षयरोग नियंत्रणासाठी उपचार सुरु करण्या आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. धामनगाव तालुका आरोग्य उभागाने राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोधमोहीम राबवली. ही मोहीम केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 2020-21 मध्ये राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे रुग्णशोध आणि गरजूंना मोफत औषधोपचार करण्यात आले. (हेही वाचा, Wet Gram Benefits: दररोज सकाळी भिजलेल्या हरभऱ्याच्या सेवनामुळे होतील 'हे' आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या)

दरम्यान, संशयित कुष्ठरोग्यांची कुष्ठ रोग तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येईल. या तपासणीत कुष्ठरोग्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून संशयीत कुष्ठरोग्यांचा शोध घेणे. संशयित कुष्ठरोग्यांची तपासणी करुन नेमक्या कुष्ठरोग्यांचा आणि या आजाराजी लागण झालेल्या नागरिकांपर्यंत पोहचण्याचा तसेच या उपक्रमाद्वारे कुष्ठरोगाची साखळी तोडण्याचा या मोहिमेचा उद्देश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट आहे. त्यामुळे राज्य सरकार सतर्क आहे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्याबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच, माझे घर माझे कुटुंब या मोहिमेद्वारे नागरिकांना असलेल्या विविध आजारांची आकडेवारीही जमा केली जात आहे. माझे घर माझे कुटुंब ही मोहीम सध्या थांबवण्यात आली असली तरी या मोहिमेद्वारे महत्त्वपूर्ण डेटा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या आजारासोबत आता कुष्ठरोगाचेही नव्याने आव्हान उभा राहू नये यासाठी प्रशासनाला सतर्क व्हावे लागणार आहे.