नाशिक येथील आडगाव शिवारात(Adgaon Shivar) एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आता हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, घराच्या आवारात बिबट्याने हळूच प्रवेश केला. त्याने दाराबाहेर झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला (Leopard Attack Dog) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरा कुत्र्याला चाहूल लागली. त्याने जोरजोराने भुंकण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही कुत्र्यांनी मिळून बिबट्याचा प्रतिकार केला. ज्यामुळे तो पळून गेला. दोन्ही कुत्र्यांनी या जंगली श्वापदाचा पाटलाग केला.
एकदा पाटलाग केल्यावर पळून गेलेला बिबट्या पुन्हा एकदा शिवारातून घराच्या आवारात आला. कुत्रे सतर्क होते. त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा पाटलाग केला. ज्यामुळे तो पळून गेला. दरम्यान, वनविभागाच्या अधिकारी वृषाली गाडे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, आडगाव शिवारात, ज्या बंगल्यात बिबट्या घुसला होता, तो परिसर प्रभावकर मनुडे नावाच्या व्यक्तीचा आहे. शिवारात भटकत असताना बिबट्या बंगल्याच्या आवारात शिरला आणि त्याने कुत्र्यावर हल्ला केला. पण कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला करून त्याचा पाठलाग करुन त्याला ताणून लावले. नागरिकांच्या निवासीवस्तीजवळ बिबट्या आल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. आम्ही पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, बिबट्याने परिसरातील कोणत्याही नागरिकाला इजा केल्याची माहिती नाही, असे गाडे म्हणाल्या.
व्हिडिओ
#महाराष्ट्र: नाशिक में कुत्ते पर तेंदुवे का हमला।#Maharashtra #Nashik #Leopard #ATTACK #Dog #CCTV pic.twitter.com/Wce1PF0yCr
— Sanjay ᗪєsai 🇮🇳 (@sanjay_desai_26) July 26, 2023
दरम्यान, एका वेगळ्या घटनेत, बुधवारी संध्याकाळी एका बिबट्याने मुंबईतील गोरेगाव जिल्ह्यातील फिल्मसिटीमध्ये "सुख म्हंजे नक्की के असतं" या मराठी टीव्ही मालिकेच्या सेटवर घुसून खळबळ माजवली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जंगली मांजर सेटच्या एका संरचनेच्या वर चालत असताना घाबरलेले लोक सुरक्षिततेसाठी धावत असल्याचे दाखवले आहे. काही लोकांनी फुटेजही रेकॉर्ड केले. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली.