डॉ. अशोक कुकडे (फोटो सौजन्य- फेसबुक)

लातूर (Latur) येथील डॉ. अशोक कुकडे (Dr. Ashok Kukde) यांना 'पद्मभुषण' (Padma Bhushan) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कुकडे यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक कार्यात पुढाकार घेतला होता. तसेच विवेकानंद रुग्णालय अर्थात संधोन केंद्राचे संस्थापक यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

डॉ. अशोक कुकडे हे मुळचे पुण्याचे असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक होते. वैद्यकीय सेवेसाठी त्यांना 1965 रोजी लातूर येथे पाठविण्यात आले होते. तसेच कुकडे यांना वैद्यकीय क्षेत्रात सुवर्णपदक ही मिळाले आहे. तर लातुर मध्ये उभारण्यात आलेले विवेकानंद रुग्णालयाचे कामकाज पाहता पाहता कुकडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बांधणी केली. या रुग्णालयासह आता लातूरात कॅन्सर उपचारासाठी नव्या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.

दीर्घ काळ क्षेत्र संचालक पद सांभाळत आलेल्या कुकडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, जनकल्याण समिती शिक्षणाचे ही अध्यक्षपदाची जबाबदारी योग्यतेने पार पाडली आहे.