Flamingo Birds (Photo Credit: ANI)

लॉकडाउनच्या सीमा ओलांडत परदेशी पाहुणे भारतात दाखल झाले आहेत. नवी मुंबईच्या (Navi Mumbai) खाडी किनारी फ्लेमिंगो पक्ष्यांचे (Flamingo Birds) मोठ्या संख्येत आगमन झाले आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्यांवर गुलाबी छटा पसरली आहे. साधारणपणे हिवाळा सुरू झाल्यानंतर प्लोमिंगो पक्षी भारतात दाखल होतात. मात्र, उन्हाळातच प्लेमिंगो पक्षी भारतात दाखल झाले आहेत. यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. गुजरात, राजस्थान, कच्छ ही या पक्ष्यांची प्रजनन स्थळे आहेत. तेथील दलदलीत हे पक्षी घरटी बांधतात आणि त्यात अंडी घालतात. नोव्हेंबर महिन्यापासून तेथील पाण्याची पातळी कमी होऊ लागते. पाणी आटल्यावर हे पक्षी महाराष्ट्रात ठाणे, उरण, शिवडी येथील खाडी किनाऱ्यांवर येतात.

थंडीची चाहूल लागली की, फ्लेमिंगो पक्षी मुंबईत दाखल होतात. मात्र, यावेळी या पक्षांनी उन्हाळ्यातच भारतात गर्दी केली आहे. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही म्हटले जाते. या पक्षांचे अनेक थवे सध्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत. या पक्षांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली पर्यटकांसाठी नेत्रसुखद ठरतात. तसेच भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो. मुंबईतील खाडी परीसरात फ्लेमिंगो पक्षाचे मोठे-मोठे थवे पाहायला मिळत आहेत. नुकताच एएनआय वृत्त संस्थने नवी मुंबईच्या खाडी किनारी ग्लोमिंग पक्षांच्या आगमनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ग्लोमिंग पक्षाचा थवा आकाशात उडत असल्याचे दिसत आहेत. हे देखील वाचा- Lockdown: श्रमिक स्पेशल ट्रेनमधून लखनऊ, उत्तर प्रदेश, भोपाळ आणि मध्य प्रदेशात जाण्यासाठी परराज्यांतील कामगार नाशिक रेल्वे स्थानकात दाखल

एएनआयचे ट्विट-

ग्लोमिंग पक्षाचे भारतात आगमन झाल्यानंतर मोठ्या संख्येने पक्षीप्रेमी आणि फोटोग्राफर नवी मुंबई येथील खाडी किनारीवर भेट देत असतात. मात्र, यावेळी संपूर्ण भारतात लॉकडाऊन असल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.