लालबागच्या राजाचा मंडपात दहा दिवस जितका थाट असतो तितकाच तो विसर्जन मिरवणूकीदरम्यानही दिसतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी बाहेर पडलेला लालबागचा राजा तब्बल 20 तासाहून अधिक काळ भाविकांना दर्शन दिल्यानंतर गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जित केला जातो. यंदाही सकाळी 9 वाजताच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर समुद्रात आतमध्ये जाऊन विसर्जित केला. मात्र यादरम्यान एक दुर्घटना घडली आहे.
लालबागच्या राजाच्या विसर्जनाची खास सोय
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीपासून समुद्रात आतमध्ये एका विशिष्ट बोटीने नेला जातो. त्यानंतर तराफ्याच्या मदतीने त्याच विसर्जन केलं जातं. दरम्यान हा मान कोळी बांधवांना दिला जातो. त्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक आणि कोळी बांधव बोटी घेऊन आतमध्ये समुद्रात जातात. मात्र लालाबागच्या राजाचं खास आकर्षण असल्याने विसर्जानाच्या वेळेसही बोटीवर भाविकांची अलोट गर्दी होती. बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक भाविक असल्याने आणि फोटो,शुटिंगसाठी झालेली गर्दी एका अपघातामध्ये पलटली. लालबागचा राजा 2018 : 'असा' दिला लालबागच्या राजाला अखेरचा निरोप
भाविकांची बोट उलटली
लालबागच्या राजाच्या अंतिम विसर्जन सोहळ्यात काही भाविक बोटींवर सवार झाले होते. अशातच दोन बोटींची धडक झाल्याने बोटीच्या टोकाला असलेले काही भाविक पाण्यात पडले. मात्र वेळीच सुरक्षारक्षकांनी पाण्यात उड्या मारून त्यांना लाईफ जॅकेक्ट्स दिले. पाण्यात पडलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.