Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी 'लाडका भाऊ योजना' (Ladka Bhau Yojana 2024) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तरूण मुलांना सरकार कडून स्टायपेंट दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे 'लाडकी बहीण' योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता 'लाडका भाऊ योजना' अंतर्गत नेमकी कोणाला , कशी आणि कधी मदत मिळणार आहे? हे जाणून घ्या आणि पहा तुम्ही या सरकारी योजनेअंतर्गत स्टायपेंट मिळवण्यासाठी पात्र आहात का?

लाडका भाऊ योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा हात सरकार कडून दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत12 वी पास झालेल्या तरूणांना दरमहा 6 हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार स्टायपेंट दिला जाणार आहे. राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल तसेच त्यांना स्वयंरोजगार मिळेल परिणामी राज्यातील बेरोजगारी कमी करण्याचा सरकारचा मानस आहे.

'लाडका भाऊ' साठी पात्रता निकष काय?

  • अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असणं आवश्यक
  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • किमान 12वी पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं. ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा केलेल्यांनाही फायदा मिळणार.
  • तरूण बेरोजगार असावा. कोठेही कामाला नसावा.
  • अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे असावीत, ज्यात डोमेसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खात्याची प्रत आणि सर्वोच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षणाची गुणपत्रिका.

नक्की वाचा: Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे, नोंदणी, निकष आणि अर्ज कसा करावा? घ्या जाणून.

दरम्यान सरकार कडून अद्याप मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना साठी ऑफिशिएल नोटीफिकेशन जारी केलेले नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याची स्पष्टता आलेली नाही. लवकरच सरकार कडून अधिकृतपणे त्याची माहिती दिली जाईल. तोपर्यंत खात्रीलायक नसलेल्या सूत्रांकडून दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका.