अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'क्यार' चक्रीवादळाचे (Kyarr Cyclone) रुपांतर आता महाचक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे. तसेच चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे पुढे सरकरत अरबी समुद्रापर्यंत पोहचले. मात्र मुंबईला या क्यार चक्रीवादळाचा धोका टळला असला तरीही महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीला याचा धोका अद्याप कायम असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत हवामान खात्याने अधिक माहिती दिली आहे.क्यार चक्रीवादळ आल्याने समुद्रात ताशी 250 किमी वेगाने वारे वाहत असून पुढील पाच दिवसात ओमनच्या येथे पोहचणार आहे. डहाळू मार्गागोव्यापर्यंत समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागाला धोक्याचा इशारा असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मात्र 1 नोव्हेंबर नंतर ही स्थिती पूर्ववत होणार आहे.
महाराष्ट्राच्या कोकण किनार पट्टीला 'क्यार' वादळाचा तडाखा बसला आहे. यामध्ये भात शेतीचे मोठ नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ऐन ऑक्टोबर महिन्यात पाणीच पाणी झालेले चित्र पहायला मिळाले. मात्र आता या चक्रीवादळाचा धोका कमी झाल्याने हळू हळू स्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा या राज्यात 21 नोव्हेंबर पर्यंत पावसाची रिपरिप राहणार आहे. (Kyarr Cyclone चा मुंबई वरील धोका टळला; 7 नोव्हेंबर पर्यंत पावसाची रिपरिप कायम राहणार: हवामान वेधशाळेचा अंदाज)
तर मुंबईत पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता तो आता ओसरला आहे. रविवारी दिवसभर कडाक्याचे उन दिसून आले. आजही ढगाळ वातावरण आहे पण पावसाची शक्यता वाटत नाही. मात्र विदर्भासह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.