Koregaon Bhima case: आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का; याचिका फेटाळी
आनंद तेलतुंबडे | (Photo courtesy: Archived, Edited Images)

Koregaon Bhima case: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे ( Anand Teltumbde) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज (शुक्रवार, 21 डिसेंबर) धक्का दिला. पुणे पोलिसांनी (Pune Police)आपल्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी तेलतुंबडे यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटळून लावली. दरम्यान, तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची असल्यास त्यांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी छापेमारी करीत अटक केली होती.

आनंद तेलतुंबडे यांचा नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचा तसेच, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातही तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचा आरोपक करत पुणे पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या कारवाईला तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेत त्यांनी आपल्यावर पुणे पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी केली होती. दरम्यान, न्यायालयाने ही मागणी याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाने या याचिकेवर शुक्रवारी सुनावनी घेतली. त्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

दरम्यान, उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांची गुन्हा मागे घेण्याबाबतची याचिका फेटळून लावली असली तरी, त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची असल्यास तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.