Photo Credit- X

Konkan Railway Disruption: कोकण रेल्वे मार्गावरील ओहरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत (Konkan Railway Disrupt) झाली. आडवली येथे ओहरहेड वायर तुटल्याची माहिती आहे. अनेक रेल्वे गाड्यांना याचा फटका बसला. या तांत्रिक अडचणीमुळे कोकण रेल्वे ठीकठिकाणी अडकून पडल्या आहेत. रेल्वे वाहतुक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे उभी करण्यात आली. (Indian Railway Recruitment 2025: नव्या वर्षात सरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वे भरती, जाणून घ्या कुठे आणि किती जागा, कसा कराल अर्ज?)

ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत

मडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे थांबवून ठेवण्यात आली आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली आहे. तसेच जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी आडवली येथे थांबवून ठेवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन तासात वाहतूक पुर्वत होईल असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. वायर जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका रेल्वे प्रवाश्यांना बसला आहे.