प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), पुणे (Pune) जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक लोकांच्या संसाराची वाताहत झाली, तर अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सरकारने ही स्थिती विचारात घेऊन मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून मिळणार आहे. तीन ते चार दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तहसीलदार आणि प्रांतअधिकारी यांना पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुरामुळे नुकसान झालेले छोटे मोठे उद्योजक आणि कागरिक यांची मदत 6 तारेखापर्यंत पुरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. पूर्णतः बँकेच्या माराफात ही मदत पुरवण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळजवळ 90 टक्के मदत पुरवली गेली असून, उर्वरीत 10 टक्के रक्कम येत्या काही दिवसांत दिली जाईल. (हेही वाचा: पूरग्रस्तांच्या घरांची प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुनर्बांधणी, शेतकऱ्यांचे 1 हेक्टरवरील नुकसानावरचं कर्ज माफ करणार: मुख्यमंत्री फडणवीस)

देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे काम सुरु आहे. ज्यांचे पंचनामे अजून झाले नाहीत अशा शेतकऱ्यांची त्यांची माहिती तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात 78 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र आता शासनाच्या आदेशामुळे लवकरच या शेतकऱ्यांना याबाबत नुकसानभरपाई मिळणार आहे.