Kolhapur Shocker: शिक्षकाने शाळेत विद्यार्थिनींना दाखवले Porn Videos; पालकांनी केली कठोर कारवाईची मागणी
प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

कोल्हापुरात (Kolhapur) शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. धक्कादायक घटनेत कोल्हापुरात एका शिक्षकाने इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ (Porn Videos) दाखवल्याचा आरोप आहे. ही घटना कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील विद्यालंकार शाळेत घडली. व्हीपी बांगडी म्हणून ओळखले जाणारे शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवतात. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, व्हीपी बांगडी यांनी शाळेतील इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवला होता.

ही घटना उघडकीस आल्यानंतर बांगडी या शिक्षकाची तत्काळ सातारा येथे बदली करण्यात आली. मात्र, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून इंग्रजी शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शिक्षकाची बदली झाली असतानाच, बांगडीवर कठोर कारवाई करण्याची विनंती विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाकडे केली आहे.

(हेही वाचा: ठाण्यात पोलिस असल्याचं भासवून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या)

दरम्यान याआधी मुंबईतील नागपाडा भागातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. पिडीत विद्यार्थिनीने हा आरोप केला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापक तिला आपल्या केबिनमध्ये बोलावून अश्लील कृत्य करत असे. या प्रकरणी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत मुख्याध्यापकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अत्याचार करणारा शाळेचा मुख्याध्याप सध्या फरार असून, मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत.