Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

शनिवार 9 मार्च दिवशी कोल्हापूर लोखंडे कुटुंबातील (Lokhande Family)  सासू-सुनेच्या झालेल्या लागोपाठ मृत्यूच्या बातमीने सुन्न झालं होतं. मात्र कोल्हापूरच्या स्थानिक पोलिसांनी लोखंडे कुटूंबातील सूनेचा मृत्यू आत्महत्या नसून तो अमानुष खून असल्याचा उलगडा केला आहे. मालती लोखंडे(Malti Lokhande) या सासूच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने शुभांगी लोखंडे (Shubhangi Lokhande) या सूनेने घराच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी अवघ्या चार दिवसात यामधील आरोपी शोधून काढला आणि ती व्यक्ती शुभांगीचा पती संदीप लोखंडे (Sandeep Lokhande) असल्याची माहिती दिली आहे.

संदिप लोखंडे यांनी राधानगरी पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबमध्ये पत्नी शुभांगी हीला सासूच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्य चेहर्‍यावर आनंद दिसला. त्यामुळे रागाच्या भरात जेव्हा शुभांगी वरच्या मजल्यावर गेली तेव्हा तिला खाली मागून धक्का देऊन पती संदीप लोखंडे खाली आला. जमिनीवर कोसळल्यावरही तिचा जीव वाचू म्हणून तिच्या डोक्यात फरशी घातल्याची कबुली संदीपने दिली आहे. कोल्हापूर: सासूच्या मृत्यूच्या धक्क्याने सुनेचा मृत्यू, आत्महत्या की अपघात? तपास सुरु

घराजवळ फरशीचा तुकडा रक्ताने माखलेला सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी संदीपची कसून चौकशी केली त्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला. संदीप आणि शुभांगीचा मुलगा यंदा दहावीच्या परीक्षेला आहे.