Kolhapur: महाराष्ट्रातील अठरा शक्तीपिठांमधील एक कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूर्तीवरुन भाविकांनी सध्या टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंदिरातील अंबाबाई यांची मूर्ती बदलण्यात यावी अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. ही मूर्ती पाच ठिकाणी भंगली गेल्याचे ही भाविकांचे म्हणणे असून गेली 12 वर्षे या मूर्तीला मस्ताभिषेक घालण्यात आलेला नाही आहे.
1917 पासून ते आजपर्यंतच्या शंभर वर्षाच्या कालखंडात अंबाबाई यांच्या मूर्तीचे फोटो पाच ठिकाणी भंगलेले आहेत. त्यामुळे मूर्तीची अवस्था न पाहण्यासारखी झाली आहे. तसेच 2016 रोजी या मूर्तीचे संवर्धन केले गेले. मात्र आजवर झालेली मूर्तीची अवस्था पाहून भाविकांनी देवीची मूर्ती बदलण्याच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. हिंदू परंपरेनुसार देवीची रोज पूजा-पठण, अभिषेक, स्नान अशा गोष्टी होणे अनिवार्य आहे. तसेच कोल्हापूरातील अंबाबाईचे हे स्थान जागृत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे देवीची पूजा ही नियमित स्वरुपात होणे गरजेचे असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. तसेच गेली तेरा वर्षे या देवीचा मस्ताभिषेक झाला नसल्याने ती 'पारोषी' राहिल्याची टीका येथील भाविकांनी केली आहे. या घटनेकडे प्रशासन आणि देवळातील पूजारी यांच्या कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
कोल्हापूरात या देवीच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक गर्दी करतात. परंतु देवीच्या या झालेल्या अवस्थेबद्दल कोणी बोलायला पुढे सरसावत नसल्याचे दिसत आहे. मात्र 2014 रोजी सुद्धा देवीच्या भंगलेल्या मुर्तीबद्दल प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.