कोल्हापूर: पूरस्थितीचा फायदा घेत नागरिकांची लूट करणार्‍या दुकान विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार;  1077 किंवा  2655416 क्रमांकावर करा तक्रार
Kolhapur Flood (Photo Credits: Twitter/ DDI Kolhapur)

कोल्हापूरमध्ये मागील 30 वर्षांमधील विक्रमी पाऊस मागील आठवड्याभरात झाला. परिणामी कोल्हापूर शहर जलमय झालं आहे. सध्या कोल्हापूरात पावसाने उसंत घेतल्याने पूराचे पाणी कमी होण्यास सुरूवात झाली आहे. अनेक बेघरांना आता अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात आहेत. अनेकजण जणं आवश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत मात्र या पूरस्थितीचा फायदा घेत अनेक जण चढ्या दराने वस्तूंची विक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुद्दामून अधिक दराने वस्तू विकणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी (Kolhapur Collector Office) दिली आहे.

पूरस्थितीचा फायदा घेत ग्राहकांची लूट करणार्‍यांची तक्रार नोंदवण्यासाठी आता हेल्पलाईन खुल्या करण्यात आल्या आहेत. 1077 आणि 2655416 या क्रमांकांवर ग्राहक तक्रार नोंदवू शकतात अशी माहिती देण्यात आली आहे.  कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना शिर्डी देवस्थानाकडून 10 कोटीची मदत तर सिद्धिविनायक मंदिरकडून पिण्याच्या पाण्याची सोय

ANI Tweet

पूराचं पाणी कमी झाल्यानंतर लाखो विस्थापितांची खाण्याची, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आता हळूहळू बाजारपेठा सुरू होत आहेत. मात्र पूरामुळे नागरिकांची झालेली गैरसोय काहीजण आपल्या आर्थिक फायद्यासाठी वळवू पाहत आहेत.

कोल्हापूरातून 2 लाखाहून अधिक लोकांची सुटका आणि विस्थापन करण्यात आलं आहे. आज सलग सातव्या दिवशीही पूराच्या पाण्यातून अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफची बचावकार्य काम करत आहेत.